श्रीराम मंदीराचा निधीबाबत समाजाला भ्रमित करण्याचे हे षडयंत्र – राधे बाबा

फैजपूर प्रतिनिधी । अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी जमा झालेल्या एक एक पैशाचा हिशोब पारदर्शक असून यात कोणताही घोटाळा झालेला नाही. हे राजनैतिक षड्यंत्र असून समाजाला भ्रमित करण्याचा प्रयत्न आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री महामंडलेश्वर मनमोहन दासजी उर्फ राधे बाबा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

येथील सतपंथ मंदिर संस्थानच्या धर्मशाळेमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, समितीचे सदस्य खंडेराव देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरूषोत्तम दासजी महाराज, स्वामी प्रभुदासजी महाराज जयपुर, महानुभाव महानुभाव संप्रदाय तथा सावदा दत्त मंदिराचे गादीपती सुरेशशास्त्री मानेकर बाबा, श्री स्वामीनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दास जी गुरुदेव सेवा आश्रम ट्रस्ट जामनेरचे श्री श्याम चैतन्य जी महाराज उपस्थित होते.

श्री राधे राधे राधे राधे बाबा यांनी सांगितले की, मध्य प्रदेश व हरियाणा सरकारच्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करून त्यांच्यासाठी गौ अभयारण्य तयार करावे, गोवंश हत्या बंदीचे कायदे कठोर करावे, गोवंश हत्या करणाऱ्याला जन्मठेप तथा मृत्युदंड ही शिक्षा द्यावी. फैजपुर शहरात असलेला कत्तलखाना त्वरित बंद करावा याबाबत अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे अन्यथा संत समिती आंदोलन छेडेल व त्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.

यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले की, नेहमी  देणगी न देणारेच कायम हिशोब मागतात. त्यांना तो अधिकार नाही. राम मंदिर उभारणीसाठी सुरुवातीपासून जे विरोध करीत होते त्यांनीच राम मंदिर जमीन घोटाळा झाल्याचा मुद्दा आता उपस्थित केला आहे. यात कोणताही घोटाळा झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Protected Content