रोटरी जळगाव सेंट्रलतर्फे मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण

जळगाव प्रतिनिधी । येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे मुलींच्या निरीक्षण गृहातील (रिमांड होम) 40 विद्यार्थीनींना ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ या उपक्रमातून व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष प्रा. डॉ. अपर्णा भट-कासार, स्नेहल शहा, मनिषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षीका संगीता चांदोरकर यांनी टिश्यू पेपर, धर्माकोल, बॉल्स, मुरमुरे आणि कोणत्याही कागदाचा वापर करुन फूले, बुके, जुन्या टी शर्टसपासून बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन प्रात्याक्षिक करुन घेतले.

निरीक्षण गृहातून बाहेर निघाल्यानंतर या मुलींना आर्थिक उत्पन्न मिळता यावे, त्या स्वावलंबी व्हावे म्हणून त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष प्रा. डॉ. अपर्णा भट-कासार यांनी दिली.

 

Protected Content