Home क्राईम चोरी करणार्‍या दोघांना अटक

चोरी करणार्‍या दोघांना अटक

0
45

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील एका घरातून संगणक व रोकड लंपास करणार्‍या दोघा चोरट्यांना पोलिसांनी मालेगाव येथून अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील बाराभाई मोहल्ला येथील रहिवासी तथा तहजीब उर्दू हायस्कूलचे शिक्षक शेख शफी शेख हसन हे अश्फाक बेग यांच्या घरात भाड्याने राहतात. ३० मे रोजी रात्री ते घरी नसतांना चोरट्यांनी रात्री घराचे कुलूप तोडून १५ हजार रूपये किमतीचा संगणक, सीपीयू व १६ हजार रूपये रोख असा सुमारे ३१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होत. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना या गुन्ह्यातील चोरटे मालेगावात लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनात एएसआय अनिल अहिरे, पोलिस नाइक शैलेश पाटील, संदीप पाटील, कॉन्स्टेबल दीपक पाटील, विनोद खैरनार यांच्या पथकाने मालेगाव येथील आयेशा नगर येथून सलमान डुबकी व इरफान आंध्या (दोन्ही रा. आयेशानगर, मालेगाव) यांना ताब्यात घेतले.


Protected Content

Play sound