Home क्राईम अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

0
24

रावेर प्रतिनिधी । फिरण्यासाठी गेलेल्या वृध्दाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना येथे घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, काल बुधवारी रात्री साडे आठ वाजेचे सुमारास  येथील अष्टविनायक नगर मधिल  शिवाजी नारायण सोनवणे (वय ६०) हे रात्री जेवणानंतर फिरावयास गेले होते. बर्‍हाणपूर -अंकलेश्‍वर महा मार्गावरून पायी असतांना शहरातील गुलमोहोर हॉटेल समोर बर्‍हाणपूर कडे जाणार्‍या अज्ञात वाहनाने मागुन धडक दिल्याने शिवाजी सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरु असतांना त्यांचे निधन झाले.

यााबाबत योगेश कन्हैय्या मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात  वाहन चालका विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार अनिस शेख करीत आहेत.


Protected Content

Play sound