जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे घरासमोर लावलेली महिद्रा मिनी व्हॅनला मध्यरात्री अचानक आग लागून जळून खाक झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, श्रीराम शेनफडू पैठणकर (वय-४५) रा. स्वामी समर्थ शाळेजवळ हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे त्यांच्या मालकीची (एमएच १९ बीयू २४४७) क्रमांकाची महिद्रा मॅक्सीमो मिनी व्हॅन आहे. ९ जून रोजी पैठणकर यांनी चारचाकी वाहन त्यांच्या घरासमोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास वाहनाला अचानक आग लागल्याने वाहन पुर्णपणे जळून खाक झाली आहे. यात ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण कळू शकले नाही. श्रीराम पैठणकर यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफुर तडवी करीत आहे.