जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनी परिसरातील मेहरूण येथील सफाई कामगार व गरीब गरजूं नागरीकांना नगरसेविका लिलाताई सोनवणे यांच्यातर्फे मोफत किराणा साहित्याचे कीट शिवसेनेचे गजानन मालपूर यांच्याहस्ते आज सकाळी वाटप करण्यात आला.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
रामेश्वर कॉलनीतील नगरसेविका लिलाताई सोनवणे आणि एस.एम. गृपतर्फे लॉकडाऊन काळात बेरोजगार झालेल्या सफाई कामगार, गरीब व गरजू नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून शिवसेनेचे गजानन मालपूर यांच्याहस्ते धान्य, साखर, चहा, मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी अनिल सोनवणे, राहूल नेतलेकर, जितेंद्र गवळी, ललित कोतवाल यांच्यासह मेहरूण परिसरातील नागरीकांची उपस्थिती होती. लॉकडाऊन पासून ते आतापर्यंत नगरसेविका लिलाताई सोनवणे आणि एस.एम. गृपच्या वतीने असंख्य गरजूंना मदतीचा हात दिला आहे. यावेळी अनिल सोनवणे आणि अनुताई कोळी परिश्रम घेत आहे. यासाठी दानशुक व्यक्तींचे सहकार्य लाभत आहे अशी माहिती अनिल सोनवणे यांनी दिली.