जळगाव प्रतिनिधी । शहरातील अंजुमन तालीमुल मुस्लिमीन अर्थातच एटीएम या संस्थेच्या अध्यक्षपदी व्यवसायिक एजाज रज्जाक मलिक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी युवा मंचतर्फे शनिपेठेत मलिक यांच्या राहत्या घरी पुष्पगुच्छ, शाल व अभिनंदन पत्र देऊन गौरव करण्यात आले.
याप्रसंगी लहान बंधू फैसल मलिक व काका रहीम मलिक यांची उपस्थिती होती. एजाज रज्जाक मलिक अभियांत्रिक पदवीधारक असलेले एजाज मलिक २५ वर्षांपासून उद्योग व्यवसाय सांभाळत आहे, जळगाव इंडस्ट्रीयल युथ असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य, ह्युमन राईट असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा कौटुंबिक सार्वजनिक विश्वस्त संस्था अब्दुल रज्जाक चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिव म्हणून कार्यरत आहे. तसेच क्रिसेंट एज्युकेशनल सोसायटीचे सचिव म्हणून त्यांना अनुभव आहे.
याप्रसंगी मन्यार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख यांच्या नेतृत्वात जळगाव शहराध्यक्ष सय्यद चाँद यांच्या मार्गदर्शनाखाली मन्यार बिरादरीचे युवा कार्यकर्ते अब्दुल रऊफ, अख्तर शेख, जावेद सैयद, साजिद सैयद,सलीम शेख, साबिर सय्यद, सलीम शेख, ताहेर शेख, हारून मेहबूब, आदींची उपस्थिती होती.