Home राजकीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा


मुंबई वृत्तसंस्था । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली.  दोघांच्या भेटीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा देखील झाल्याचे समोर आले आहे. 

शरद पवारांवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी अनेकदा विविध कारणांसाठी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता फडणवीसांनी देखील पवारांची भेट घेतली असल्याचं एक कारण सांगितलं जात आहे. याशिवाय राज्यात सध्या मराठा आरक्षण व अनेक महत्वाचे मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने याबाबतही या भेटीत चर्चा झाली असावी असंही बोललं जात आहे.

 

 


Protected Content

Play sound