जळगाव प्रतिनिधी । स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, नायब तहसीलदार रविंद्र मोरे, अमित भोईटे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.