अकोला (वृत्तसेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना वंचिन बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचा सर्वात मोठे ब्लॅकमेलर असा उल्लेख केला आहे. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्यासाठी भाजपाने त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यासोबतच काँग्रेसने कोणासोबत आघाडी करु नये, यासाठी भाजपानेच खोडा घातल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्लॅकमेलर असून सोनिया गांधींसह अनेकांना ब्लॅकमेल करत असतात असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तुमच्या जावयाला जेलमध्ये जायचे नसेल तर तुम्ही कोणासोबतही आघाडी करु नका अशी अट नरेंद्र मोदींनी काँग्रेससमोर ठेवली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. काँग्रेससोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काँग्रेससोबत आघाडी करायची होती, पण दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यामुळे आघाडी होऊ शकली नाही असा आरोपही त्यांनी केला.