रावेर, प्रतिनिधी । पत्रकार स्व सतीश नाईक यांना रावेरच्या पत्रकारांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी रावेरच्या पत्रकारांना स्व. नाईक यांच्याबद्दल बोलतांना अश्रु अनावर झाले.
दैनिक सामनाचे रावेर तालुका प्रतिनिधी सतीश नारायण नाईक यांचे १३ मे रोजी निधन झाले. त्यांना आज रावेरच्या पत्रकारांतर्फे श्रद्धांजली वाहून त्याच्या आठवणीना उजाळा देण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार देवलाल पाटील (दै. तरुण भारत), प्रदीप वैद्य(दै. सकाळ), नासुदेव नरवाडे( दै. दिव्य मराठी), दिलीप वैद्य(दै. सकाळ), जयंत महाराज ( महाराष्ट्र 10), शकील शेख (दै. भास्कर), सुनिल चौधरी (दै. गावकरी), प्रकाश पाटील(दै. पुण्य नगरी), कृष्णा पाटील( दै. दिव्य मराठी), शालीक महाजन, प्रविण पाटील, पिंटू महाजन, चंद्रकांत विचवे( दै. देशदूत) आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी स्व. सतीष नाईक यांच्या बद्दलच्या आठवणीला उजाळा देण्यात आला. यावेळी पत्रकार शकील शेख यांना स्व. सतीष नाईक यांच्याबद्दल बोलतांना अश्रु अनावर झाले.