राज्य सरकारची दुटप्पी भूमिका : मनसेची टीका

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यात पुन्हा एकदा यश येताना दिसत आहे. मात्र, रुग्ण संख्या कमी होण्याच्या श्रेयावरून मनसेने राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 

रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकारचं यश अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यम कशी घेऊ शकतात? अशा थेट सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.  यासंबंधी त्यांनी एक ट्वीटही केलं. ज्यामध्ये रुग्णसंख्या कमी होणं ही खूप चांगली बाब आहे. याचं श्रेय मुख्यमंत्री आणि सरकार घेत आहे. पण रुग्ण संख्या वाढली की त्याला नागरिक बेजबाबदार आणि कमी झाली की सरकारचं यश अशी दुटप्पी भूमिका सरकार कशी घेऊ शकतं अशी टीका त्यांनी केली आहे.

 

Protected Content