Home आरोग्य कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची श्रमिक कामगार संघटनेची मागणी

कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्याची श्रमिक कामगार संघटनेची मागणी

0
47

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आंध्र प्रदेश राज्याने नुकतीच कोरोना बाधितांना मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच धर्तीवर राज्यात ही रूग्णांना निःशुल्क सेवा बजावण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेतर्फे तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यात सर्वसामान्य जनतेचा पैशांच्या अभावामुळे हाल होत आहेत. किंबहुना हजारो रुग्णांच्या मृत्यूत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे हि गैरसोय दूर करून राज्यातील सहकारी व खासगी दवाखान्यात कोरोना बांधीत रूग्णांना मोफत उपचार देण्यात यावे, या आशयाचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच अशोक राठोड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर लागलीच त्यांनी रूग्णांची सेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्याप्रमाणे रूग्णांच्या समस्यांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे रूग्णांची होत असलेली ही हेळसांड थांबवून मागणी लवकरात लवकर मान्य करण्यात आले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक राठोड, धर्मराज बागुल, वसंत मारसाले, गौतम जाधव, स्वप्निल जाधव, साईदास गोलैत व मुकेश नेतकर आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound