रावेर, प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात रावेर पोलिसांनी अवैध दारू विक्रेते, वाहतूक करणारे दारूभट्टीवाले यांच्यावर ४ ते ६ मेदरम्यान २१ छापे टाकून ५० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार रावेर पोलिसांनी शहर व तालुक्यातील अवैध दारू विक्रेते, दारूभट्टीवर कारवाई करत २१ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अखिल तडवी ( रा. खिरोदा प्र )., सुभाष सोनवणे (रा. रावेर ), जगदीश पाटील (रा. वाघोड) , निलेश महाजन (रा. भगवती नगर रावेर) , जावेद तडवी ( रा सहस्त्रलिंग ), अस्लम तडवी ( रा. मोरवाल) , राजू तडवी , अयुब तडवी (रा. कुसुम्बा खु ) , श्रीराम बारेला (रा. निमडया) , ललिता राठोड ( रा. पाल ), रेहान तडवी (रा. भोकरी) , ईश्वर गाढे (रा. अहिरवाडी) , दिपक महाजन ( रा. जुना सावदा रोड रावेर) , शरीफ तडवी ( रा. मुंजलवाडी), राहुल सूरदास (रा. मुंजलवाडी) , रुमसिंग बारेला ( रा. गारखेडा) , पिंटू तडवी ( रा. मोरवाल) , रघुनाथ धनगर ( रा. मुंजलवाडी) , फकिरा तायडे ( रा. नेहता) , मनोज तायडे (रा. अहिरवाडी) , रघुनाथ तायडे (रा. अहिरवाडी) यांच्याकडून एकूण ५० हजार ८८०/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या सर्व २१ आरोपीवर गुन्हे दाखल करून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय शितलकुमार नाईक व पोलीस स्टाफने ही कारवाई केली. रावेर पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईने अवैध दारू काढणारे, विकणारांचे धाबे दणाणून गेले आहेत.