Home Cities जळगाव रविवारी बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

रविवारी बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

0
39


 

जळगाव, प्रतिनिधी । भगवान परशुराम जन्मोत्सवाचे औचित्य साधून बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे  रविवार दि. ९ मे  रोजी रक्तदान शिबिराचे  आयोजन करण्यात आले आहे.

भगवान परशुराम जन्मोत्सव व स्व.बलदेव उपाध्याय यांच्या  स्मरणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  रविवार दि. ९ मे रोजी आकाशवाणी चौक येथे सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. तरी सर्व समाजबांधवांनी यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अशोक वाघ यांनी केले आहे. दरम्यान, रक्तदानाच्या नियोजनासाठी रेड क्रॉस सोसायटी ह्यांच्या मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार आहे.

 


Protected Content

Play sound