जिल्ह्यात आज १००७ बाधित रूग्ण आढळले; १०३० झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ७ बाधित रूग्ण आढळून आले असून १ हजार ३० रूग्ण कोरोनावर मात करत सुखरुप घरी परतले आहेत. तर दुसरीकडे आज २१ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

आजची आकडेवारी –

जळगाव शहर- १४१, जळगाव ग्रामीण-२०, भुसावळ-१०१, अमळनेर-४७, चोपडा-३२, पाचोरा-१४८, भडगाव-०८, धरणगाव-१२, यावल-३१, एरंडोल-५८, जामनेर-११२, रावेर-४७, पारोळा-१७, चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर-१११, बोदवड-६१ आणि इतर जिल्ह्यातील ०३ असे एकुण १ हजार ७ रूग्ण आढळून आले आहे.

कोवीड अहवालात आजपर्यंत १ लाख २२ हजार ४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ९ हजार १५९ रूग्ण बरे होवून घरी पतरले आहे. उर्वरित १० हजार ६६१ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. तर आजपर्यंत जिल्ह्यात २ हजार १८४ रुणांचा कोरोनाने बळी घेतला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

 

Protected Content