पाचोरा येथे लोककला राहतकोष समितीतर्फे जीवनावश्यक किराणा साहित्याचे वितरण

पाचोरा प्रतिनिधी । लोककला राहतकोष व ग्राम स्वराज समिती, निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलावंतांना जीवनावश्यक किराणा साहित्यांचे वितरण करण्यात आले. खलील देशमुख यांच्या हस्ते लाभार्थींना जीवनावश्यक वस्तू किट वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत चाळीसगाव, भडगाव व पाचोरा या तीन तालुक्यातील  लोककला प्रकारातील सुमारे ९० गरजु लोककलावंतांना मदत केली जाणार आहे. कोरोना आपत्तीच्या कठीण काळात ज्या लोकांची उपजीविका केवळ लोककले वर आधारित आहे. अशा अनेक कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षभरापासून मुख्य उत्पन्नाचे साधनच जवळ जवळ बंद झाले आहेत. सरकार जी काही मदत जाहीर करते त्यात हा संपूर्ण समुदाय नेहमी उपेक्षितच राहतो. ग्राम स्वराज समिती आणि निरुती लोकाआर्त यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला राहतकोष या उपक्रमाची सुरवात असून याअतंर्गत गरजू लोककलावंतासाठी महिन्याकाठी लागणारा किराणा मदत म्हणून देत आहोत. सद्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तीन तालुक्यातील लोककलावंत यांना उपक्रमा अंर्तगत मदत करत आहोत. लाभार्थी निवडतांना  पुढील पैकी निकष समोर ठेवत आहोत.

 सदर लाभार्थी हा भूमिहीन असावा, त्यांची उपजीविका ही लोककला सादरीकरणावर आधारित असावी, अथवा त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन लोककला सादरीकरण हे असावे, जेष्ठ नागरिक असल्यास प्राधान्य. वरील निकषा नुसार एकूण ९० लाभार्थींना महिना सरासरी १ हजार ५०० रुपये इतक्या किंमतीचा किराणा माल पुरवणार आहोत. यात दैनंदिन आहारा साठी लागणाऱ्या साहित्यांचा अंतर्भाव आहे.  एक लाभार्थी १ हजार ५०० रुपये या प्रमाणे एकूण ९० लाभार्थी साठी १ लाख ३५ हजार रुपये इतका खर्च आहे. आम्ही आरंभीलेल्या या मदत कार्यात आपण योग्य ती मदत करावी ही विनंती ग्राम स्वराज समिती आणि निऋति लोकार्ट यांच्या मार्फत करण्यात आली आहे.

लोककला राहत कोष एक उपक्रमाचे समन्वयक म्हणून कल्पेश देशमुख हे काम पाहत आहे. तसेच ग्राम स्वराज समितीचे अध्यक्ष शंकर बगाडे व विश्वस्त  डॉ. सुगन बरण्ठ यांच्या मार्गदर्शन लाभत आहे. चंद्रकांत ग्रोगरी यांनी यास मोलाचे अर्थ सहाय्य केले आहे. तसेच विजया ठाकुर, सागर नागणे, सचिन आगोने, लोककालवंत प्रकाश वाघ, शाहिर परशुराम सुर्यवंशी, मोरसिंग राठोड, पप्पू सोनवणे पाचोरा यांचे सहकार्य लाभत आहे.

 

Protected Content