Home आरोग्य देशात कोरोनाचा विस्फोट : २४ तासांमध्ये उच्चांकी ३.७९ लाख रूग्ण

देशात कोरोनाचा विस्फोट : २४ तासांमध्ये उच्चांकी ३.७९ लाख रूग्ण


 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । । कोरोनाचा कहर कमी होण्यास तयार नसून गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल ३.७९ लाख रूग्ण आढळले असून आजवरची ही उच्चांकी संख्या ठरली आहे.

 

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. दुसरीकडे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ६९ हजार ५०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्याच्या घडीला ३० लाख ८४ हजार ८१४ अॅक्टिव्ह रुग्ण असून १५ कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे.


Protected Content

Play sound