Home क्राईम जळके येथून पाच गुरांची चोरी; एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

जळके येथून पाच गुरांची चोरी; एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

0
105

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातून पाच गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, भगवान बाबुराव पाटील (वय-२६) रा. जळके ता. जि.जळगाव हे शेतकरी असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २५ एप्रिल रोजी त्यांच्या गोठ्यामध्ये दिलीप पाटील यांच्या मालकीचे त्यांच्याकडे शेताच्या कामासाठी दोन गाय, एक वासरी आणि बैल बांधलेले होते. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने ४३ हजार रूपये किंमतीचे पाचही गुरे चोरून नेल्याचे २६ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता उघडकीला आले. परिसरातील शेतकरी आणि ओळखीच्या व्यक्तींना विचारणा केली असता गुरांचा तपास लागला नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भगवान पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शशीकांत पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound