Home धर्म-समाज फैजपुरात मोठा मारुती जन्मोत्सव साजरा

फैजपुरात मोठा मारुती जन्मोत्सव साजरा


 

 

 

फैजपूर :  प्रतिनिधी  ।  शहरातील पुरातन जागृत देवस्थान म्हणून धोबी वाड्यातील मोठा मारुती मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात मंगळवारी हनुमान जन्मोत्सव भाविकांनी साजरा केला

 

या मंदिरातील मूर्तीला  सकाळी सहा वाजता जल, दूध अभिषेक पूजन व आरती   माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे यांचे हस्ते करण्यात आली .  पुरोहित नंदू महाराज, दिनेश जोशी यांनी विधिवत पूजन केले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

 

कोरोना नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने  गर्दी न करता, मास्कचा वापर करून असंख्य भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते . कोरोना महामारी नष्ट व्हावी. जनजीवन सुरळीत सुरु रहावे , सर्वाजण  सुखी समाधानी रहावे अशी प्रार्थना माजी नगराध्यक्ष वाघुळदे  यांनी  केली. यावेळी रमेश गलवाडे, विलास काठोके, रणजित राजपूत, कैलास चौधरी, संजू धोबी,धोंडू सोनवणे, विवेक चौधरी, शिवा रावते आदी  उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound