कुरंगी प्रतिनिधी। पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे राहणाऱ्या तरूणाने विहिरीतील दगड फोडण्यासाठी लागणारी जिलेटीनची कांडी पॅटच्या खिश्यात ठेवून आराम करण्यासाठी खाटीवर झोपला असता ती दाबली गेल्याने तिचा स्फोट होऊन जबर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. पाचोरा येथे उपचारार्थ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील भिल वस्तीत राहणारा तरूण नाना बाळा भिल वय-12 हा काल संध्याकाळी शेळी चारुन घरी येत असताना कुरंगी जुन्या गावात मोठ्या प्रमाणावर विहिरी आहेत त्या परीसरात हि जिलेटीन कँप त्याला सापडली होती. विहिरीतील दगड फोडण्यासाठी वापरले जाणारे जिलेटीनची कांडी पॅटच्या खिश्यात सोबत घेवून आला. घरी आल्यानंतर जिलेटीनची कांडी न काढता तश्याच स्थितीत खाटीवर आराम करण्यासाठी बसला असतां जिलेटीनची कांडी दबली गेली. कांडी दबली गेल्यांनी तिचा जागीच स्फोट झाल्याने तरूण गंभीररित्या जखमी झाला. त्याला तातडीने पाचोरा येथे खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.