यावल प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेच्या विस्तारित क्षेत्रातील नवीन वसाहतीत नवीन नळ जोडणीसाठी मुदत वाढ व लागणारी आकारणी व नगरपालिकेने कमी करावी अशी मागणी परिसरातील तरूणांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीचा काळ ओढावला. नगरपरिषदच्या वतीने सुमारे ५ कोटी ७५ लाख २ रुपये खर्च करून नव्या जलकुंभाची उभारणी केली आहे. विस्तारीत क्षेत्रातील विविध भागामध्ये या जलकुंभावरून नागरीकांना मुबलक स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, याकरीता जलवाहिनी पाईपलाईव टाकण्यात आली असुन या पाईपलाईन वरून नगरपरिषदने नळजोडणीच्या कार्यास सुरुवात करण्यात आली आले. यासाठी नगर परिषदेकडून नवीन नळजोडणी करीता ५ हजार ६५० रुपये प्रत्येकी अकरणी करण्यात येत आहे. कोरोना संकटाच्या काळात ही नळजोडणीची रक्कम अधिक असल्याने ३००० ते ३५०० पर्यंतची अकारणी करण्यात यावी अशी मागणी गणपती नगर , तिरूपत्तीनगर व आयशानगर या क्षेत्रातील राहणाऱ्या अशपाक शाह, सुलेमान शेख लुकमान, रईस शेख बिस्मिल्ला , सईद खाटीक ,युसुफ शेख इस्हाक, रऊफ नसिर खान , रिजवान हारीस शेख आदींनी नगर परिषद अमोल मदने यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.