Home Cities अमळनेर जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता व वरिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता व वरिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

0
36

अमळनेर प्रतिनिधी । स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत बांधलेल्या शौचालयाचे बील मंजूर करण्यासाठी लाच मागणारा जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ सहाय्यकाला आज एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, खेडी प्र. अ. तालुका अमळनेर येथील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यात नमूद करण्यात आले होते की, स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत त्याने शौचालयांचे बांधकाम केले होते. या बांधकामाचे बीले काढण्यासाठी त्याने जिल्हा परिषदेचे अभियंता अरूण जगन्नाथ चव्हाण आणि वरिष्ठ सहाय्यक योगेश बापू बोरसे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यावेळी त्याला बील देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. यानंतर त्याच्याकडे चव्हाण यांनी बील काढण्यासाठी २० हजार तर बोरसे याने बील तयार करण्यासाठी पंधराशे रूपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

ही तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पथक तयार केले. जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, अमळनेर येथे या पथकाने सापळा लावत अरूण जगन्नाथ चव्हाण, वय-५७, व्यवसाय- कनिष्ठ अभियंता, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर (रा.मराठा कॉलनी,अमळनेर ता.अमळनेर) आणि योगेश बापू बोरसे, वय-४२, व्यवसाय- वरीष्ठ सहाय्यक, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर (रा.प्रताप मिल, कंपाऊंड, अमळनेर) वर्ग-३ या दोघांना अनुक्रमे २० हजार आणि पंधराशे रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आली.

ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक निलेश लोधी,सफौ.दिनेशसिंग पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्दन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्‍वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली.


Protected Content

Play sound