रावेर : प्रतिनिधी । ख़िरवड नजिक अवैध वाळू वाहतुक करणारे टॅक्टर-ट्रॉली महसूल पथकाने पकडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अवैध वाळू वाहतुक करणारे टॅक्टर-टॉली येत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती.खिरवळ नजिक ही कारवाई करण्यात आली आहे. या पथकात मंडळ अधिकारी मीना तडवी, थेरोळा तलाठी सौ बर्वे , तलाठी किर्ती कदम , तलाठी रवी शिंगणे , तलाठी बि एम वानखेडे , तलाठी नीलेश चौधरी , तलाठी विजय सिरसाडसह कोतवाल गणेश चौधरी यांचा सहभाग होता.बऱ्याच दिवसानंतर महसूल पथकाकडून अश्या पध्दतीची कारवाई झाली आहे.