Home Cities जळगाव दुचाकी चोरट्यास एलसीबीकडून अटक

दुचाकी चोरट्यास एलसीबीकडून अटक


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील फुपनगरी येथून शेतकर्‍याच्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

विरसिंग शिवलाल बारेला (बोरगाव ता. पधाना जि. खंडवा मध्य प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील फुफनगरीतील श्यामकांत जाधव या शेतकर्‍याची दुचाकी चोरीची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दुचाकी चोरणारा संशयित हा कानळदा येथे त्याच्या नातेवाइकाकडे आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार बकाले यांनी हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहुल पाटील, चालक हे.कॉ. भारत पाटील यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. मिळालेल्या माहितीनुसार पथक आज मंगळवारी कानळदा गावात पोचल्यावर संशयित वीरसिंग बारेला हा चोरीच्या दुचाकीवर फिरताना मिळून आला. पथकाने त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीची दुचाकी ताब्यात घेतली. गेल्या दोन वर्षांपासून संशयित बारेला हा दुचाकीची नंबरप्लेट काढून चोरीची दुचाकी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे.संशयितास पुढील कारवाईसाठी तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Previous articleराहुल गांधींना कोरोना
Next article४४ लाखांहून अधिक कोरोना लसी वाया
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound