चाळीसगाव प्रतिनिधी । वैद्यकीय परवाना नसताना तालुक्यातील हातगाव अंधारी रस्त्यालगत एका बंगाली डॉक्टरांनी जोरात आपला व्यवसाय थाटला असून ही गंभीर बाब उजेडात येताच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी छापा टाकून डॉक्टर विरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हातगाव अंधारी रस्त्यावर एका बंगाली डॉक्टरांनी अनाधिकृत दवाखाना सुरू केला आहे. परवाना नसताना त्यांनी हा दवाखाना सुरू केला असल्याने हि गंभीर बाब तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारीच्या निदर्शनास आली. लागलीच तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांना घटनेची माहिती दिली. त्यावर आज मंगळवारी १९ एप्रिल रोजी सकाळी १०:२० वाजताच्या सुमारास छापा टाकण्यात आला असता. त्याठिकाणी दोन जणांना सलाईन लावण्यात आली होती. तसेच इतर रूग्णं हे दवाखान्यात उपचारासाठी दाखल होते. दरम्यान बंगाली डॉक्टरला पदवी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र मागितले असता. घटनास्थळाहून डॉक्टरने पळ काढला. वैद्यकीय परवाना नसताना रूग्णांच्या जीवाशी खेळणार्या या डॉक्टरांवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लांडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवी कलम 419, 420, महाराष्ट्र वैद्यक व्यावसायि अधिनियम 1961 चे कलम 33, 34, 36, 38 प्रमाणे गुन्हा दाखल केले आहेत. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भालचंद्र पाटील हे करीत आहेत.a