जळगाव प्रतिनिधी । जागतिक हिमोफेलिया दिनाच्या जनजागृतीसाठी शनिवार १७ एप्रिल २०२१ रोजी नशीराबाद येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात भारती विद्यापीठाच्या डॉ.अर्पणा काले यांनी मार्गदर्शन केले. याआधी रंगबेरंगी रांगोळीद्वारे हिमोफेलियाचे चित्र रेखाटण्यात आले.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक हिमोफेलिया दिनानिमित्त भारती विद्यापीठाच्या डॉ.अर्पणा काले यांनी ऑनलाईन वेबिनारद्वारे हिमोफेलिया म्हणजे काय ? हे सांगत तो कसा ओळखावा आणि त्यावर उपचार काय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रागंणात बीएसस्सी नर्सिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी हिमोफेलियाची आकृती रांगोळीद्वारे मांडली. याप्रसंगी विभागप्रमुख प्रा.विशाखा वाघ, प्रा.अश्विनी मानकर, प्रा.मोनाली बरसागडे, प्रा.स्मिता पांडे, प्रा.सुनिता मिरपगारे तसेच एम.एस्सी नर्सिंगच्या प्रथम, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकवृंद उपस्थीत होते.