नंदुरबार प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन जिल्हा स्तरावर कोरोना ‘वॉर रूम’ स्थापन करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. के.सी. पाडवी यांनी दिले आहेत.
पालकमंत्री ना. के. सी. पाडवी यांनी कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाला तातडीने कार्यवाही Nandurbar Corona News करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाबाधित व्यक्ती घरी राहिल्यास किंवा बाहेर फिरल्यास संसर्ग वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोना बाधितांवर विलगीकरण कक्षातच उपचार करावे. तसेच तातडीने वॉर रूम स्थापन करावा, असे निर्देश पालकमंत्री पाडवी यांनी दिले आहे.
दरम्यान, सुदृढ नागरिकांनी भावना नियंत्रित ठेवून कोरोनाबाधित व्यक्तीसोबत रुग्णालयात थांबू नये. बाधित व्यक्तींनी काही दिवस विलगीकरण कक्षात राहिल्यास त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार करता येईल. तसेच संसर्ग नियंत्रणात राहू शकेल. कोरोना संसर्ग नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी कोविड वॉर रूम स्थापन करावा. प्रत्येक तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात यावा. या कक्षाद्वारे नागरिकांना उपचाराच्या सुविधा, लसीकरण आदीबाबत माहिती देण्यात यावी. नियंत्रण कक्षात अधिकार्यांच्या सहकार्यासाठी दोन स्वयंसेवक ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री अॅड. पाडवी यांनी दिले आहे.
या वॉर रूमच्या माध्यमातून Nandurbar Corona News जिल्ह्यातील जनतेला कोविडच्या प्रतिकारासाठीची तात्काळ आणि अचूक माहिती मिळण्यास मदत होणार असून रूग्णांवर अचूक उपचार करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन ना. के.सी. पाडवी यांनी याप्रसंगी केले.