Home Cities यावल चुंचाळे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन

चुंचाळे ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० वी जयंती कोरोना विषाणु संसर्गाच्या सातत्याने वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची काटेकोर अमलबजावणी करीत जयंती ही अत्यंत साद्या पद्धतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी चुंचाळे ग्रामपंचायतच्या सरपंच सुनंदा संजय पाटील, ग्रामसेवक प्रियांका बाविस्कर, ग्रामपंचायत सदस्य रहेमान तडवी, संजय पाटील यांच्यासह  कार्यालयाचे शिपाई मनीष पाटील, ग्रामरोजगार सेवक दीपक कोळी यांचेसह ग्रामस्थांसह विनोद पाटील, संजय पाटील उपस्थित होते.


Protected Content

Play sound