जळगाव प्रतिनिधी । बीएचआर प्रकरणात पुणे आर्थीक गुन्हे शाखेने अटक केलेल्या ठेवीदारांचा दलाल विवेक ठाकरे याचा जामीन अर्ज आज पुणे येथील विशेष न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे.
बीएचआर सोसायटीतील अवसायकच्या काळात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्यात रंजना घोरपडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी वर्ग करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्यासह पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात येवून सीए महावीर जैन, प्रकाश वाणी, विवेक ठाकरे, धरम साखला, कमलाकर कोळी यांना अटक केली होती तर २२ जानेवारी २०२१ रोजी सुनील झंवर याचा मुलगा सूरज याला अटक केली.
बीएचआर प्रकरणातील ठेविदार यांचा दलाल विवेक ठाकरे याने आज पुणे येथील विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. आज न्यायालयात युक्तीवाद होवून न्यायालयाने ठाकरेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.