Home क्राईम वाकडी ग्रा.प. सदस्य विनोद चांदणे यांच्या  मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेले वाहन जप्त

वाकडी ग्रा.प. सदस्य विनोद चांदणे यांच्या  मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेले वाहन जप्त


 

wakado

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील वाकडी येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद चांदणे यांचे १९ मार्च रोजी अपहरण करून खुन करण्यात आला होता. त्यांच्या मृतदेहाची मोहाडी तालुका पाचोरा परिसरात एका शेतातील विहिरीत फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. या गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

तपासादरम्यान आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन आरोपीने पोलिसांना दाखवले असून त्याचा क्रमांक एम.एच.०२ – ए.एल.८७६६ असा आहे. हे वाहन आरोपी महेंद्र श्यामसिंग राजपूत, रा.शेळगाव, ता.जामनेर यांचे असून त्यांनी तशी कबुली दिली आहे. शेळगाव येथील शहापूर रोडवर एका बंदिस्त वाड्यात हे वाहन लपवलेले आढळून आले. गाडीतील रक्ताच्या डागांचा पंचनामा करून ते पोलिसांनी जप्त केले आहे. डी.वाय.एस.पी. ईश्वर कोतकर यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, “गोपीनिय अहवाल असल्याने सध्यातरी आम्ही तुम्हाला कोणतीही माहिती देऊ शकत नाही”, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. श्री. कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पहुरचे पी.एस.आय.किरण बर्गे, पो.काँ. शंशिकात पाटील, किरण पाटील, जामनेर पोलीस स्टेशनचे पो.काँ. राहुल पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Previous articleप्रा. कांचन सुभाष भगत यांना पीएचडी
Next articleLIVE : शिवसेनेचा जिल्हा मेळावा
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound