Home क्राईम जिल्हा रुग्णालयातून मोटारसायकल लांबविली

जिल्हा रुग्णालयातून मोटारसायकल लांबविली

two wheelar thift

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दुचाकी लंपास झाल्याची घटना ३१ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील शिरसोली नाका येथील बारा खोल्यातील रहिवासी चंद्रकांत कृष्णा बागुल (वय २७) या तरुणाने त्याच्याकडे असलेली होंडा कंपनीची युनिकॉर्न ही (एमएच १९ बीआर ५८५५) क्रमांकाची दुचाकी शासकीय वेद्यकीय महाविद्यालयातील मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील सार्वजनिक ठिकाणी लावलेली होती. सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास ते दुचाकीजवळ आले असता

त्यांना आपली दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी गाडीचा सर्वत्र शोध घेतला मात्र तरी देखील दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्यातक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसात दुचाकी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ज्ञानेश्‍वर सपकाळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound