जळगाव प्रतिनिधी । शहरातील उस्मानिया पार्कमधील सार्वजनिक जागेतून दोन मोटारसायकली लंपास झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील उस्मानिया पार्कमधील मशिदीजवळील रहिवासी शेख मोहंमद रफिक मोहंमद (वय ५२) यांची (एमएच १९ डीई ९१६३) यांची होंडा शाईन व (एमएच १९ सीई ४५५०) क्रमांकाची दोन मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३१ मार्च रोजी उघडकीस आली. दोन मोटारसायकल लंपास झाल्याची कळताच त्यांनी परिसरात मोटारसायकलींचा शोध घेतला. मात्र तरी देखील न मिळून आल्याने त्यांना दुचाकी चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी तात्काळ शहर पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भास्कर ठाकरे हे करीत आहे.