चाळीसगाव प्रतिनिधी । आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेच्या निषेधार्थ चाळीसगाव तालुक्यातील कृष्णापुरी तांडा येथे ग्रामस्थांनी चूलबंद आंदोलन करून ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला.
तालुक्यातील सात हजार शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याच्या प्रकरणी अटकेत असलेले आ. मंगेश चव्हाण यांच्या अटकेच्या निषेधार्थ तालुक्यातील कृष्णापुरी तांडा येथे एकदिवसीय चुल बंद आंदोलन करण्यात आले. आ. मंगेश चव्हाण यांना अटक करण्यात आल्याने ठिकठिकाणी ठाकरे सरकारच्या विरोधात निदर्शने केली जात आहे. तसेच त्यांची तात्काळ सुटका करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कृष्णापुरी तांडा येथे गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ठाकरे सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या हातात मेणबत्ती पेटवून आ. मंगेश चव्हाण यांची सुटकेची प्रार्थना केली. ठाकरे सरकारने त्वरित आ. मंगेश चव्हाण यांना सुटका केली नाही तर प्रत्येक तांड्यातून जेलभरो आंदोलन करू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. यावेळी प्रविण राठोड, रुपसिंग जाधव, सागर राठोड, अशोक जाधव, शाणीबाई राठोड, कमलाबाई राठोड, दोलीबाई राठोड, राजेंद्र राठोड, रवी जाधव, विलास राठोड तसेच समस्त कृष्णापुरी ग्रामस्थ उपस्थित होते.