जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद शिवारातील शेतात एका शेतकऱ्याच्या शेतातील कलिंगड कारमधील चार जणांनी घेतले परंतू मोबदल्यातील ८०० रूपये मागितल्याचा राग आल्याने चौघांनी शिवीगाळ व बेदम मारहाण केली तर शेतकऱ्याच्या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार २८ मार्च रोजी सायंकाळी घडला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील नशिराबाद येथील शेतकरी आपल्या पत्नी, मुलगा व मुलगीसह राहतात. नशिराबाद शिवारातील सुनसगाव रोडवरील राम बायोटेक कंपनीच्यासमोर त्याचे मामाचे शेत आहे. त्या शेतात त्यांनी कलिंगडची शेती केली आहे. २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास एका चारचाकी कार मधून बाळु चाटे, विठ्ठल पाटील, सुपडू सोनवणे आणि एक अनोळखी व्यक्ती (पुर्ण नाव महित नाही) चौघेजण शेतात आले. त्यावेळी शेतकरी व त्याची मुलगी शेतात काम करत होते. चौघांनी शेतकरी यांच्याकडे कलिंगड मागितले. त्यांनी काहीही एक न ऐकता चौघांनी शेतातील ८०० रूपये किंमतीचे न कलिंगड तोडले. नऊ कलिंगडाचे पैसे मागितले असता चौघांनी पैसे देण्यास नकार दिला. तर यातील चौघांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तर चौघांनी शेतकऱ्याच्या मुलीला अश्लिल हावभाव करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजेंद्र साळुंखे करीत आहे.