जळगाव प्रतिनिधी । होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढीस लागू नये यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी २८ ते ३० मार्च या कालावधीत विशेष निर्बंध लागू केले असून याबाबतचे निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढीस लागल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमिवर, जिल्हाधिकार्यांनी निर्देश जारी केले आहेत. यात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात २८ मार्च रोजी होळी व २९ मार्च रोजी धुलीवंदन साजरा होत आहे. त्यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २८ मार्च ते ३० मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे.
* ठळक मुद्दे –
* सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार बंद राहतील.
* किराणा दुकाने इतर सर्व दुकाने बंद राहतील,
* किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी विक्री केंद्र बंद राहतील.
* शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद राहतील.
* हॉटेल, रेस्टॉरंट (पार्सल सकाळी ९ ते रात्री ९ वगळता) बंद राहील
* सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतीक, धार्मीक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.
* शॉपींग मॉल्स, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलुन, लिकर शॉप बंद राहतील.
* गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षणगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.
* पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीचे ठिकाणे बंद राहतील.
*खासगी वाहतूक बंद राहतील. (अत्यावश्यक सेवा वगळता)
*दुध विक्री केदं सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्या सुरू राहतील.
*नियोजित वैधानिक सभा ऑनलाईन पध्दतीने घेता येतील.
*कोवीड लसीकरण केंद्र सुरू राहणार
*औद्योगीक अस्थापना सुरू राहतील, (ओळखपत्र बाळगणे आवश्यक)
*होळी व धुलीवंदन निमित्ताचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द व मनाई राहणार.
वैद्यकीय उपचार, सेवा मेडीकल स्टोअर्स, ॲम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटना यांना सुट देण्यात आली आहे. दरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज काढले आहे.