Home क्राईम शिरसोली येथील प्रौढाने घेतला गळफास; एमआयडसी पोलीसात नोंद

शिरसोली येथील प्रौढाने घेतला गळफास; एमआयडसी पोलीसात नोंद

0
100

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील ४० वर्षीय प्रौढाने बेरोजगारीच्या नैराश्येतून राहत्या घरात काहीही कारण नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज  सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालूक्यातील शिरसोली प्र.न. येथील रहिवासी विशाल सुभाष पाटिल (वय-४०) यांना दारुचे व्यसन जडले होते. बेरोजगारीतून व्यसनाधीनता यातुन नैराश्याच्या भावनेतून घरात कोणीही नसतांना आज २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. विशाल यांच्या पाश्चात पत्नी व दोन मुले  असा परीवार आहे.  दुपारी दोन वाजेच्या सुमारास कुटूंबीयांच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ उतरवुन जिल्‍हारुग्णालयात आणले डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मयत घोषीत केले. एमआयडसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 


Protected Content

Play sound