Home आरोग्य कोरोना : परभणी जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत बससेवा पुर्णत: बंद

कोरोना : परभणी जिल्ह्यात ३१ मार्च पर्यंत बससेवा पुर्णत: बंद


परभणी वृत्तसंस्था । जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. आजपासून आंतरजिल्हा आणि जिल्ह्याअंतर्गत बस सेवा 31 मार्चपर्यंत पुर्णपणे बंद असणार आहे. 

परभणी जिल्ह्यात साधारणत: जिल्ह्यातून 800 ते 900 बस फेऱ्या होत असतात त्या बंद झाल्या असल्याने एसटी महामंडळाला रोज 30 लाखांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. याशिवाय हॉटेल्स, रेस्टारंट, चहा ठेले, पानपट्टी धारक यांनाही आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा देता येणार आहे. एकूणच वाढत्या संसर्गाने जिल्ह्यातील निर्बंध हे अधिकपणे कडक करण्यात आले आहेत.

 परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाने कडक पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर 18 मार्चला एसटी बसला तब्बल एक लाख रुपयांचा दंड केला होता.


Protected Content

Play sound