पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा संघटकपदी रतिलाल पाटील


 

 

 

3b2f369a 36b3 45b1 bfc6 f6c326995355

एरंडोल (प्रतिनिधी) येथील लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  आणि  दै. जनशक्तिचे पत्रकार रतिलाल भाईदास पाटील यांची पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली असून तशा आशयाचे लेखी पत्र त्यांना संघटनेमार्फत देण्यात आले आहे. रतिलाल पाटील गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून याआधीही त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार संरक्षण समितीने त्यांना जिल्हा संघटक पदाची जबाबदारी सोपविली आहे. नियुक्तीबद्दल त्यांचे ज्येष्ठ पत्रकार आल्हाद जोशी, उदय पाठक, प्राध्यापक सुधीर शिरसाट, शिरिष विंचुरकर, राजधर महाजन व पिंटू राजपूत आदींनी अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here