यावल : प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात आज जागतिक ग्राहक दिन निमित्ताने महसुल विभागाच्या विविध अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावर्षी राज्य शासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्हास्तरिय वेबिनारद्वारे १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजीत करण्यात आले होते . या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील तालुक्याल विविध विभागातील तहसीलच्या अधिकाऱ्यानी ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी दिल्या होत्या ,
यावल तहसीलमधील निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन तथा करमणुक निरिक्षक राजेश भंगाळे, पुरवठा हिशोबनिस कारकुन सकावत तडवी , सुयोग्य पाटील, संगणक संचालक योगेश्वरी ताडे , प्रविण तायडे यांच्यासह खातेनिहाय विविध प्रशासकीय अधिकारी आदीनी ऑनलाईन कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला