जळगाव प्रतिनिधी । समता नगरात मित्राचे आपापसातील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर दोघांनी चॉपरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. रामानंदनगर पोलीसात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विक्की रविंद्र इंगळे (वय-२१) रा. समता नगर जळगाव हे मित्र मोन्या (पुर्ण नाव माहित नाही) याच्या सोबत महाबळ येथे फिरण्यासाठी ९ मार्च रोजी रात्री ९ वाजता गेले. समता नगरातील बाबसाहेब पुतळ्याजवळ अशाफाक पटेल आणि जयेश कोळी दोन्ही रा. समता नगर यांच्यासोबत मोन्याचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यावरून कशाला भांडण करता असे विक्की बोलल्याचा राग आल्याने जयेशने शिवीगाळ करून चॉपरने उजव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. तर अशफाक पटेल यांने चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. घाबरून विक्की हा धामनगाव वाडा चौकात असलेल्या मित्रांनी विक्कीला जखमीवस्थेत जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विक्की इंगळे याच्या फिर्यादीवरून जयेश कोळी आणि अशफाक पटेल यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुशिल चौधरी करीत आहे.