जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असून आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ६०५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगावातील रूग्ण संख्या दोनशेच्या पार असून चाळीसगाव, चोपडा, भुसावळ व धरणगावात पॉझिटीव्ह रूग्ण संख्या वाढीस लागल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-२०५, जळगाव ग्रामीण-६, भुसावळ-५३, अमळनेर-१७, चोपडा-४५, पाचोरा-०, भडगाव-१७, धरणगाव-५२, यावल-१५, एरंडोल-३०, जामनेर-१८, रावेर-७, पारोळा-२८, चाळीसगाव-७९, मुक्ताईनगर-२४, बोदवड-१ आणि इतर जिल्हे-८ असे एकुण ६०५ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आज आलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजवर ६५ हजार ७४३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५९ हजार १३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ५ हजार १८९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज चाळीसगाव, भुसावळ, जामनेर तालुक्यातून प्रत्येकी १ आणि चोपडा तालुक्यात २ असे एकुण पाच रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दपत्रकान्वये कळविले आहे.