Home क्राईम काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांवर हल्ला

काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांवर हल्ला

0
21

जळगाव प्रतिनिधी । काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संजय वराडे यांच्यावर अज्ञात टोळक्याने हल्ला केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मूळचे चिंचोली (ता. जळगाव) येथील रहिवासी असणारे व सध्या अयोध्यानगरात राहणारे संजय वराडे यांनी काल सायंकाळी डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतली. यानंतर साधारणत: पावणेनऊ वाजेच्या सुमारास ते घरी जाण्यासाठी निघाले असतांना मालती हॉस्पीटलच्या समोर दोन-तीन जणांनी हॉकी स्टीकने त्यांना मारहाण केली. यात त्यांच्या कारचे नुकसान झाले असून हल्लेखोरांनी त्यांचे पाच हजार रूपये व सोन्याची अंगठीदेखील लंपास केली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून याबाबत संजय वराडे यांनी पोलीसात तक्रार दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound