मुंबई: वृत्तसंस्था । उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण शिवराज्य सुंदर ग्राम अभियान जाहीर केलं आहे. ग्रामीण भागात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानावेळी निर्माण झालेले उत्साहात्मक वातावरण पाहायला मिळणार आहे.
ग्रामीण भागातील घनकचरा, सांडपाणी, शौचालय, व स्वच्छताविषयक कामे, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, गावातील वृद्ध नागरिक, महिला व बालकांसाठी आरोग्य सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचं जीवनमान उंचावणं हा शिवराज्य सुंदर ग्राम अभियानाचा उद्देश आहे. हे अभियान राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात येणार आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवर पुरस्कार देण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनेअंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षात 6 हजार 829 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अजित पवार आणि शंभुराज देसाई यांचं अभिनंदन करतो. आजपर्यंत आपण पाहिलं असेल दरवर्षीप्रमाणं अर्थसंकल्प माडला गेला. संपूर्ण जगाची आर्थिक उलाढाल मंदावणारी गतवर्षीची वाटचाल होती. कोणतेही रडगाणं न गाता प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पातून दिसते. महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानानं उभं करण्यासाठी प्रयत्न, कृषी, शिक्षण, दळणवळण या क्षेत्रांना गती देण्याचं काम अर्थसंकल्पानं केलं आहे.प्रत्येकाला त्यांच्या चष्म्यातून पाहण्याचा अधिकार आहे , असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले .