Home अर्थ शिवनंदन फाऊंडेशनचे वीज मिटर संदर्भात महावितरणला निवेदन

शिवनंदन फाऊंडेशनचे वीज मिटर संदर्भात महावितरणला निवेदन

0
106


जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर भागात राहणाऱ्या ग्राहकांचे वीज मीटर खंब्यावर न बसवता घराच्या बाहेर बसवावी या मागणीसाठी शिवनंदन फाऊंडेशनच्या वतीने आज ५ मार्च रोजी महावितरण कार्यालयात निवेदन देण्यात आले. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. शिवाजी नगर परिसरात महावितरण कंपनीने घरातील मीटर खंब्यावर बसविण्यात येत आहे. खंब्याजवळ हे मीटर बसविल्यानंतर भविष्यात एखाद्या मीटरमध्ये शॉर्टसर्किटमुळे सर्व मीटर जळून खाक होवू शकतात. एखाद्या वाहनामुळे  विज मीटरची तोडफोड होणे, लहान मुलांचा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल आहे. यासर्व गोष्टी घडल्यास जबाबदारी घेण्यास महावितरण कंपनी घेण्यास नकार देत आहे. तसेच शिवाजी नगर परिसरातील खडकेचाळ सबस्टेशनचा हेल्पलाईन नंबर कायमस्वरूपी बंद आहे. या गोष्टीची दखल घेवून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी शिवनंदन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. या निवेदनावर विजय राठोड, विशाल वाघ, छाया कोरड, वैभव बुधवंतर, प्रविण पगारे, लक्ष्मण शेळके आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 


Protected Content

Play sound