जळगाव प्रतिनिधी । घरघुती वादाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी व शिवीगाळ केल्याचा प्रकार जुने एमआयडीसी परिसरातील सदगुरू नगरात सोमवारी १ मार्च रोजी सकाळी घडला. याप्रकरणी विनयभंग आणि हाणामारी असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
हाणामारीच्या फिर्यादीत म्हटले आहे की, जुने एमआयडीसी परिसरातील सदगुरू नगरात राहणारे रतिराम सावकारे, धिरज रतिराम सावकारे, सरोज लोखंडे आणि ललीता श्यामराव जयकर, व २५ वर्षीय तरूणी सर्व रा. सदगुरू नगर यांनी शेजारी राहणाऱ्या आश्विनी मिलींद सोनवणे व तीचे पती मिलींद किसन सोनवणे यांच्यात घरघुती वादाच्या किरकोळ कारणावरून १ मार्च २०२० रोजी सकाळी ११ वाजता अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेला संशयित आरोपी रतिराम सावकारे याने तुझ्या घरात घुसून तुझ्यासह तुझ्या मुलाला मारून टाकेल अशी धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनयभंगाच्या गुन्ह्यातील फिर्यादीत म्हटले आहे की, २५ वर्षीय तरूणी ही शिक्षण करते. दरम्यान तरूणी ही १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता दुसऱ्या मजल्यावर गेली असता शेजारी राहणारा आश्विनी मिलींद सोनवणे या महिलेने तरूणीच्या वडीलांना ‘काय रे भडव्या काय करतोय’ असे बोलून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तरूणीला अश्लिल शिवीगाळ केली. मिलींद सोनवणे याने तरूणीचा हात पकडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी तरूणीच्या फिर्यादीवरून मारहाण व विनयभंग केल्याचा एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.