अखेर स्मिताताई वाघ यांचा उमेदवारी अर्ज दाखल ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । खूप संभ्रमाचे वातावरण निर्मित झाल्यानंतर अखेर आज स्मिताताई वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

खासदार रक्षाताई खडसे यांच्यासोबत स्मिताताई वाघ यादेखील अर्ज सादर करणार असल्याचे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यांनी अर्ज न दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पक्षाने त्यांना अर्ज दाखल करण्यापासून थांबविल्याची चर्चादेखील रंगली होती. या पार्श्‍वभूमिवर आज स्मिताताई वाघ यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे आता सर्व चर्चांना विराम मिळाला आहे.

 

*पहा ।* स्मिताताई वाघ उमेदवारी दाखल करतांना

 

Add Comment

Protected Content