Home आरोग्य पुण्यात रात्रीच्या संचारबंदीची मुदत वाढवली

पुण्यात रात्रीच्या संचारबंदीची मुदत वाढवली

0
39

 

पुणे : वृत्तसंस्था ।  पुण्यात  रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी २८ फेब्रुवारीपर्यंत आता वाढवण्यात आली आहे  शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत.

 

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून याची माहिती दिली.महानगरपालिका हद्दीत करोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग १४ मार्चपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल,” अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

 

 

रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आली असून अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे.  अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार आहे,” असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

 

 

 


Protected Content

Play sound