Home Cities अमळनेर सारांश सोनार यांचा गौरव

सारांश सोनार यांचा गौरव

0
121


अमळनेर प्रतिनिधी । येथील युवा वक्ते तथा धुळे विधी महाविद्यालय विद्यार्थी सारांश धनंजय सोनार यांचा नुकताच मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज ऑफ लॉ , धुळे येथे वार्षिक स्नेहसंमेलनातील पारितोषिक वितरण कार्यक्रमात , वर्षभरात मिळवलेल्या विविध साहित्यिक , सांस्कृतिक कार्यक्रम , स्पर्धातील यशाबद्दल, राष्ट्रीय-राज्य महोत्सवातील यशाबद्दल सारांश सोनार यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर मंगला धोटे ( मुख्य जिल्ह्या न्यायाधीश , धुळे ) बॅरिस्टर रवींद्र लघाटे ( लंडन कोर्ट ) महेंद्र निळे ( संस्थाध्यक्ष , धुळे ) डॉ. विजय बहिरम ( प्राचार्य ) यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. हा सत्कार स्वीकारणे खूप प्रेरणादायी व आनंदायी वाटल्याची प्रतिक्रिया सारांश सोनार यांनी यावेळी व्यक्त केली.

सारांश हा येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजर सोनार यांचा मुलगा आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्या ज्योती राणे, प्रा रमेश माने प्रा प्रा नितीन पाटील प्रा संदीप नेरकर प्रा भावसार, डिगंबर महाले, प्रा एस. ओ. माळी, प्रा अशोक पवार अशोक बिर्‍हाड़े, डॉ जी. एम. पाटील, सतीश देशमुख, सब रजिस्ट्रार इंद्रवदन सोनवणे, दिलीप सोनवणे, पी. टी. धर्माधिकारी, अनिल चौधरी, विनोद राऊळ, डॉ राजेंद्र पिंगळे तालुका व शहर पत्रकार संघ सुवर्णकार समाज आदींनी स्वागत केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound