जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीपेठ येथे कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्याची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी २४ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत किसन पाटील (वय-६४) रा. वाक ता.भडगाव हे कामाच्या निमित्ताने २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता दुचाकी (एमएच १९ बीएच ७३६९) घेवून आले. जळगावातील नवीपेठ परिसरातील गजानन मेस येथे दुपारी २ वाजता आले. दुचाकी मेस समोर लावली, खासगी काम आटोपून ते पुन्हा दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध करूनही दुचाकी आढळली नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे हे करीत आहे.